जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याचे नावलौकीक करा - पालकमंत्री ना. बच्चू कडू
अकोला,दि.4(जिमाका)- इच्छा शक्तीच्या
जोरावर यश मिळवून अकोल्याला नावलौकीक मिळवून दयावे, असे प्रतिपादन राज्याचे
जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व
बालविकास इतर
मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त
जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार
राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू
कडू यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सन 2019-2020 चे जिल्हा क्रीडा
पुरस्काराचे वितरण जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यावेळी
मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश
कुळकर्णी, क्रीडा प्रशिक्षक सतिशचंद्र भट आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा