जिल्ह्यात कोविड-19 च्या रुग्णासाठी पुरेशे बेड उपलब्ध

 

अकोला,दि. 20 (जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर, युनिक हॉस्पिटल, अवघाते हॉस्पीटल अकोला ॲक्सीडेंन्ट हॉस्पिटल व राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदीक महाविद्यालय असे एकूण 124 बेड उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यात आयटीयु ऑक्सीजन आयसोलेशन आदीचा समावेश आहे.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर तसेच राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदीक महाविद्यालय या शासकीय रुग्णालयात कोविड-19 रुग्णावर उपचार सुरु आहेत. याशिवाय जिल्ह्यात युनिक हॉस्पिटल अकोला, अवघाते हॉस्पिटल अकोला, अकोला क्सीडेंन्ट हॉस्पिटल तसेच आयकॉन हॉस्पिटल अकोला,ओझन हॉस्पिटल व हॉटेल रिजेन्सी येथेही कोविड-19 च्या रुग्णांचा उपचार होत आहे. या शिवाय 200 खाटांचे अतिरिक्त व्यवस्था करण्याची जिल्हा व आरोग्य प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. तरी बेड उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण असल्यास  रुग्णांनी या बाबत आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ