सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची कामे एका महिन्यात पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश


अकोला दिनांक 17- कोविड विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे यासाठी जिल्ह्यात असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ची कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या कोविड-19 च्या संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये, डॉ कुसुमाकर घोरपडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे ,डॉ सिरसाम, डॉ रमेश पवार ,सीपीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता बी .सुनील कुमार, संजय शेवाळे यांची 
 प्रमुख उपस्थिती होती.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कामे त्वरित पूर्ण करावीत  यावर नियंत्रण अधिकारी म्हणून वैद्यकीय महाविद्यालया च्या अधिष्ठाता डॉ.गजभिये व उप अधिष्ठाता डॉ. घोरपडे हे काम पाहतील. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ला लागणारे यंत्रसामुग्री तसेच राहिलेले इतर कामे व कोविड हेल्थ सेंटर  म्हणून कामात येण्यासाठी लागणाऱ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
आयुर्वेदिक महाविद्यालय व अनुसंधान केंद्रामध्ये कोविड हेल्थ केअर युनिट सुरू करण्याबाबत प्राथमिक तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी केली. आयुर्वेदिक महाविद्यालयात पन्नास खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.कोवीड रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे यासाठी खाटांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. 
0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ