रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 158 चाचण्या, 16 पॉझिटिव्ह
अकोला,दि. 7 (जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज
दिवसभरात झालेल्या 158 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले
नाही. अकोट येथे 49 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह
आला नाही, बार्शीटाकळी
येथ 10 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल
पॉझिटिव्ह आला, तेल्हारा
येथे 16 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अकोला
मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला
आयएमए येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटिव्ह आला, 65 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 158 चाचण्यांमध्ये 16
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 13865 चाचण्या झाल्या त्यात 816 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा