527 अहवाल प्राप्त; 106 पॉझिटीव्ह, 31 डिस्चार्ज, तीन मयत


अकोला,दि.4(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 527 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 421  अहवाल निगेटीव्ह तर 106 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 23 तर खाजगी लॅब मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.   त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4356 (3487+775+94)  झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 29330 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 28532, फेरतपासणीचे 183 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 615 नमुने होते. आजपर्यंत एकूण 29023 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 25536 तर पॉझिटीव्ह अहवाल  4356 (3487+775+94) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 106 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 106 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 87 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 33 महिला व 54 पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 24 जण, निंबा मुर्तिजापूर येथून 11 जण, मोरवा ता. बाळापूर येथील सात जण, जीएमसी येथील सहा जण, कौलखेड, विद्यानगर गौरक्षणरोड, वाडेगाव  येथील प्रत्येकी तीन जण, खडकी, गीता नगर, जठारपेठ, डाबकी रोड, दहिगाव गावंडे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, लोणी, चोहट्टा बाजार, तुकाराम चौक, गायत्री नगर, गंगा नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, मलकापूर, मराठा नगर, कापसी, तापडीया नगर, निंबवाडी, सकनी महान, पातूर नंदापूर, प्रोफेसर कॉलनी, शिवसेना वसाहत, बळवंत कॉलनी व रवि नगर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नऊ महिला व 10 पुरुष  आहे. वाडेगाव येथील 11 जण, बाळापूर येथील चार जण तर उर्वरित नांदुरा ता. तेल्हारा, बटवाडी ता. बाळापूर, कासारखेड ता. बाळापूर व खेडगाव येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचेही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

तीन मयत

दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात मलकापूर येथील 55 वर्षीय महिला असून ती दि. 2 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिरसोली ता. तेल्हारा  येथील 65 वर्षीय महिला असून ती दि.19 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला तर मुर्तिजापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून तो दि.29 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

31 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 29 जणांना तर कोविड केअर सेंटर, अकोला येथून दोन जणांना अशा एकूण 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

819 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4356 (3487+775+94) आहे. त्यातील 163 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3374  संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 819 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना