176 अहवाल प्राप्त; 103 पॉझिटीव्ह, 146 डिस्चार्ज, पाच मयत


अकोला,दि.14(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 176 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 73 अहवाल निगेटीव्ह तर 103 अहवाल पॉझिटीव्ह आले तर पाच मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि. 13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा  तर खाजगी लॅब मध्ये आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5723 (4617+951+155)  झाली आहे. आज दिवसभरात 146 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 33444 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  32566, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 683 नमुने होते. आजपर्यंत एकूण 32999 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28382  तर पॉझिटीव्ह अहवाल  5723 (4617+951+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 103 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरा 103 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 33 महिला व 44 पुरुष आहे. त्यात जीएमसी येथील आठ जण, मलकापूर येथून सहा जण, मुर्तिजापूर येथील पाच जण, कौलखेड  येथील चार जण, अकोट, आदर्श कॉलनी, जठारपेठ, तापडीया नगर  येथील प्रत्येकी तीन जण, रामनगर, खडकी, गौरक्षण रोड, गितानगर, मोठी उमरी, वाडेगाव, खदान येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित दुर्गा चौक, इडस्ट्रीयल कोर्ट, चांदणी ता. पातूर, सुकोडा ता.अकोला, चांदूर, सोनोरी ता.मुर्तिजापूर, जयहिंद चौक, खोलेश्वर, लहान उमरी, वाशिम बायपास, रणपिसे नगर, वानखडे नगर, जूने शहर, विजय नगर, खेतान नगर, सुधीर कॉलनी, शिवाजी कॉलेजजवळ, केला प्लॉट, उदयवाडी खरप रोड, आगर, कच्ची खोली, रामदास पेठ, जोगळेकर प्लॉट, पिंजर, कृषी नगर, सिव्हील लाईन, दहिहांडा व डोंगरगाव  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  26 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 12 महिला व 14 पुरुष  आहे. त्यातील बोरगाव मंजू  व आगर येथील प्रत्येकी चार जण, पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शास्त्री नगर, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी, लहरीया नगर, चोहट्टा बाजार, गौरक्षण रोड, डाबकी रोड, मोठी उमरी, सिव्हील लाईन, गोडबोले प्लॉट व डोंगरगाव ता. अकोला येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, कृपया नोंद घ्यावी.

पाच मयत

दरम्यान आज पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात डाबकी रोड, अकोला येथील 60 वर्षीय महिला असून ती 9 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, शिरसो, मुर्तिजापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून तो 10 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, भिडेवाडी, बाळापूर रोड, अकोला येथील 64 वर्षीय पुरुष असून तो 11 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, जठारपेठ, सिव्हील लाईन अकोला येथील 80 वर्षीय पुरुष असून तो 8 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर सोनारी ता. मुर्तिजापूर येथील 64 वर्षीय महिला असून ती 13 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

146 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 76 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 66 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून प्रत्येकी तीन जण, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून एकाचा अशा एकूण 146 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1165 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5723 (4617+951+155)  आहे. त्यातील 186 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4372 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1165 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ