महिलांसाठी माविमतर्फे ऑनलाईन उखाणे स्पर्धा गुरुवार दि.10 पर्यंत व्हीडीओ पाठविण्याचे आवाहन
अकोला,दि.2 (जिमाका)- उखाणा घेणे
हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे
असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या
निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गौरी गणपती आणि येणारी नवरात्र या
पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम)
ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
सदर स्पर्धा सर्व
महिलांसाठी खुली असून ती निशुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.
त्यांनी नाविण्यपूर्ण, जनजागृती करणारे,
सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका
उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार
करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे गुरुवार (दि.10) पर्यंत पाठवावा.
उखाणे
निवडीचे निकष
उखाणे नाविण्यपूर्ण
असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा,
उखाणे हा 'मौखिक साहित्यिक प्रकार आहे तरी सदर
स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा, आपण सर्वसाधारणपणे आपल्या यजमानांच्या नावाभोवती
उखाणे गुंफत असतो, पण या स्पर्धेत आपणाला उखाणे समाजसुधारक, ऐतिहासिक
व्यक्तीरेखा(विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड काळातील
अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती गुंफणे अपेक्षित
आहे. उखाणा स्त्री पुरुष समानता या मुल्यांचा पुरस्कार
करणारा असावा, उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन
मिनिटांचा लांब असावा, उखाणा मुखोदगत किवा पाठ असावा.
जिल्ह्यात प्राप्त
उखाण्याची जिल्हास्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे
तीन क्रमांक व माविमेत्तवर महिलांचे तीन क्रमांक असे सहा व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात
येतील. प्रति जिल्हा सहा याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील.
ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे तीन क्रमांक व माविमेत्तोर
महिलांचे तीन क्रमांक काढून सहा
व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. सहा विभागाचे मिळून 3६ पात्र व्हिडीओ या मधून राज्यस्तरावर केवळ माविमच्या महिलांचे तीन क्रमांक व
माविमेत्तिर महिलांचे तीन असे सहा
क्रमांक काढले जातील, मात्र विभागीयस्तरावर 36 पात्र महिलांना स्पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व
सन्मानचिन्ह देण्यात येईल. राज्यस्तरीय विजेत्या सहा महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र
आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्यात
येर्इल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा