‘पोकरा’योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री ना. बच्चू कडू




अकोला,दि.4(जिमाका)-  स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना (पोकरा) ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असून त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी विविध स्तरावर असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कृषी विभागाला दिले.

 पोकरा योजनांचा आढावा आज ना. बच्चू कडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,  उपसंचालक अरुण वाघमारे, कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

व्यक्तीगत लाभाच्या योजना, सामूहिक लाभाच्या योजना व शेती गट व कंपणी यांच्या लाभाच्या योजना या प्रकारचे वर्गीकरण करावे. त्याप्रमाणे नियोजन करुन शेतकऱ्यामध्ये पोकरा योजनेबाबत जनजागृती  करण्यासाठी  पॉम्पलेट छापावे. योजनाची अंमलबजावणी परिपूर्ण करावी. कोणीही कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश, यावेळी संबंधिताना दिले. पोकर योजनेअंतर्गंत निवड झालेल्या प्रत्येक गावांनी सार्वजनिक कामे सूचवावे व त्यांचा प्रस्ताव एकत्रीत सादर करावे, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिले. कट्यार गाव शेतीसाठी दत्तक घेवून पोकरामधील सर्व कामाचा त्यात समावेश करावा. जमीनीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी एक योजना तयार करावी. यासाठी आवश्यकता वाटल्यास विशेष बाब म्हणून शासनस्तरावर मंजूर घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात 485 गावांची पोकरा योजना अंतर्गत निवड झाली असून आतापर्यंत 47 हजार 962 अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 21 हजार 160 अर्ज वैद्य ठरले असून 3 हजार 23 लाभार्थ्यांना 6 कोटी 16 लक्ष रुपयांचे निधीचे वितरण करण्यात आले असल्याचे माहिती पोकरा प्रकल्प विशेषज्ञ सागर डोंगरे यांनी दिली.  सामूहिक लाभाच्या योजनेअतर्गंत 17 बचत गट किवा शेतकरी उत्पादक गट यांना गोदाम, कृषि औजारे बँक, प्रक्रीया युनिट आदिसाठी अनुदान देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना