जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बेरोजगार उमेदवारांनी आधार कार्ड लिंक करून डेटा अपडेट करावा; जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांचे आवाहन

 



अकोला,दि. 16 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच  रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या आणि स्वरोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड लिंक करुन आपला डेटा अपडेट अद्यावत करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या ज्या बेरोजगार उमेदवारांनी अद्याप आपल्या नोंदणीला आपले आधार कार्ड जोडले (लिंक) नसेल. अशा सर्व उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ही प्रकिया पूर्ण करावी असे, आवाहन  जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी याचे दालनात जिल्हा कौशल्य विकास कार्यकारणी ची बैठक झाली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर, सुधाकर झळके यांची उपस्थिती होती. ही प्रक्रिया www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरून पुर्ण करावी अन्यथा 30 सप्टेंबर 2020 अखेर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल. आपणास अशा प्रकारे आधार नोंदणी जोडण्याबाबत काही अडचन निर्माण असल्यास या कार्यालयाच्या ०७२४-२४३३८४९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ