रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 162 चाचण्या, 23 पॉझिटिव्ह
अकोला,दि.3 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 162 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर,
तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर अकोट येथे
33 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर अकोला मनपा येथे 78 चाचण्या
झाल्या त्यात 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला आयएमए येथे सात चाचण्या
झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथे चाचण्या झाल्या नाही, तर 44 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 162
चाचण्यांमध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले.
तर आजपर्यंत 13438 चाचण्या झाल्या त्यात 782 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा