अकोला जहॉगीर येथील रास्तधान्य दुकानदारावर कार्यवाही


        अकोला,दि. 30 (जिमाका)- जिल्हाधिकारी यांचेकडे प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने उपजिल्हाधिकारी निवडणुक मुकेश चव्हान, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे, अकोटचे निरिक्षण अधिकारी टी.डी. चव्हाण, पुरवठा निरिक्षक गौरव राजपुत तसेच इतर पथकासह अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथे 23 सप्टेंबर रोजी पथकाने अकोली जहांगीर येथील रास्त भावदुकान क्रमांक 12 चे प्राधीकार पत्रधारक ए.टी.गोठवाल यांचे दुकानची तपासणी  केली त्यावेळी रास्त भाव दुकानदार उपस्थीत नव्हते त्यांचे भाऊ नरेंद्र गोठवाल उपस्थीत होते. गावातील नागरीकांचे समक्षही कारवाई करण्यात येवून गावातील नागरीकांचे बयान सुध्दा नोंदविण्यात आले. तसेच या घटनेचे फोटो व व्हीडीओ देखील काढण्यात आले. तपासणी दरम्यान रास्तभाव दुकानांमध्ये मोठया प्रमाणावर मध्यम तसेच गंभीर स्वरुपाचे दोष आढळुन आले तसेच सार्वजनीक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणारे गहु - 413‍ क्विंटल, तांदुळ-151.50 क्विंटल, अखा चना-9.50 क्विंटल तसेच चना दाळ-6.00 क्विंटल असा एकुण अंदाजीत कींमत 17 लक्ष 39 हजार 350 रुपयांचे धान्य त्यांचे घरामध्ये तसेच घराचे परीसरात अवैध साठा केला असल्याचे दिसुन आले. यांचा रीतसर पंचनामा,  जप्ती नामा करुन जप्त मुद्देमाल रास्तभाव दुकानदार यांचे भाऊ नरेंद्र गोठवाल यांचे ताब्यात सुपुर्द नामा करुन देण्यात आला. सदरची कारवाई 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशीरापर्यंत सुरु होती.

            याबाबत पोलीस स्टेशन अकोट येथे निरिक्षण अधिकारी तथा पुरवठा निरिक्षक अकोट तहसील कार्यालय 25 सप्टेंबर  रोजी दुपारी वरील गुन्ह्याबाबत पोलीस स्टेशन अकोट येथे अकोली जहाँगीर येथील रास्तभाव दुकानदार ए.टी.गोठवाल यांचे विरुध्द जिवनावश्यक वस्तु अधीनीयम 1955 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले असून त्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करण्यात आलेली नाही. तसेच रास्त भाव दुकानाचे लाभार्थी धान्यापासुन वंचीत राहु नये म्हणुन त्याच गावातील मे. साई महीला बचत गट यांना शिधापत्रीका जोडुन लाभार्थींना धान्याचे वितरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे,  असे जिल्हा पुरवठा अधिकारी बि.यु.काळे यांनी कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ