पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा

अकोला,दि.1 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 10 वा. 30 मि. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 10 वा. 55 मि. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण व सकाळी 11 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व बैठकीत उपस्थिती.  सायंकाळी सहा वाजेपर्यंत शासकीय अधिकारी यांचे समवेत खालील विषयावर आढावा बैठक.

१.      कृषी व पोखरा अंतर्गत विविध योजनांचा आढावा

२.      अपंग निधी खर्च आढावा

३.      महिला, मुलींचे आश्रम, वसतीगृहे व इतर समस्यांबाबत आढावा

४.    वन्यजीव व वने याबाबत आढावा

५.     अकोला थॅलेसिमीया रुग्णांचे  समस्यांबाबत आढावा

६.      जिल्ह्यातील तालुका स्तरावरील कोविड-19 बाबत आढावा बैठक

बैठकीनंतर सवडीने मुर्तिजापूर मार्गे, जि. अमरावती कडे प्रयाण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना