28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत आधुनिक दुग्धव्यवसायाचे ऑनलाईन प्रशिक्षण


अकोला,दि. 25 (जिमाका)-  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ] नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, कृषिनगर, अकोला तर्फे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने आधुनिक दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात कमी खर्चात शास्त्रोक्त पध्दतीने हा व्यवसाय कसा करावा यावर विविध विषयतज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पशुतज्ञ डॉ. शैलेश मदने यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.

            शेतकरी, पशुपालक, दुग्धव्यवसायिक, बेरोजगार युवक-युवती, नवोद्योजक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. तसेच प्रशिक्षणासंबंधी 9552794560 किवा 9860365002 (डॉ. दिलीप बदुकले) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ