ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे वेबीनारव्‍दारे उद्घाटन

 

 अकोला,दि. 24 (जिमाका)- जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला शासकीय औैद्योगिक प्रशिक्षण संस्‍था मुलींची, अकोला यांच्या संयुक्‍त विद्यमाने  20 सप्‍टेंबर ते 25 सप्‍टेंबर दरम्‍यान एकुण 11 विविध खाजगी आस्‍थापनांनी त्‍यांचेकडील 300 पेक्षा अधिक अधिसुचीत केलेल्‍या पदांकरीता आयोजित ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे 23 सप्टेंबर रोजी ऑनलाईन वेबीनारव्‍दारे उद्घाटन विधान परिषद सदस्य आ.डॉ.रणजित पाटील यांचे हस्‍ते संपन्‍न झाले.  यावेळी उपआयुक्‍त एस. आर. काळबांडे, कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्‍तालयाचे पी. एन. जयस्‍वाल, जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन वेबीनार कार्यक्रमांचे प्रास्‍ताविक जिल्‍हा कौशल्‍य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्‍त प्रां.यो.बारस्‍कर यांनी तर आभार प्रदर्शन शासकीय औैद्योगिक प्रशिक्षण संस्‍थाचे प्राचार्य राम मुळे यांनी केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ