जिल्ह्यात तीन ठिकाणी डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर सुरू

 


अकोला,दि. 13 (जिमाका)-  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांनी दिले आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रस्तावित केल्यानुसार अवघाते बाल रुग्णालय व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मूर्तिजापूर येथे 20 बेड, युनिक हॉस्पिटल, वाशिम बायपास रोड अकोला येथे 18 बेड आणि अकोला अक्सिडेंट क्लिनिक, लक्ष्मी नगर अकोला येथे 16 बेड  आवश्यक साहित्य, मनुष्यबळ व सर्व सुविधेसह डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याची परवानगी अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात आली आहे.

अटी व शर्ती :

डेडीकेटेड कोविड  हॉस्पीटल केन्द्रामध्ये आयसीएमआर व राज्य आरोग्य व कुंटूब कल्याण विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी  निर्गमित होणारे आदेश तसेच मार्गदर्शक सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील,  तसेच  नमूद केल्यानुसार  बेड ऑक्सीजनसह उपलब्ध करुन देण्यात यावे, डेडीकेटेड कॉविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना ते घेत असलेल्या सोई सुविधांकरीता शासनाचे धोरण तसेच दरपत्रकानुसार उपचाराकरिता शुल्क आकारण्यात यावे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येवू नये. जास्त रक्कमेची आकारणी केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

 कोविड बाधित उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा तसेच आवश्यकतेप्रमाणे ऑक्सीजन व व्हेन्टीलेटर उपलब्ध ठेवण्यात यावा. आयसीएमआर व राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन दयावे,  या सेंटरमध्ये रुग्णांचे उपचारार्थ लागणारा पुरेशा प्रमाणातील तज्ञ डॉक्टर, कर्मचारी व अधिकारी वर्ग 24x7 नियमीतपणे उपस्थित ठेवावा लागेल. सदर कोविड हॉस्पीटलमध्ये संशयित कोविड रुग्णांचे घशाचे किवा नाकाचे नमूने घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, पल्स ऑक्झीमिटर व्हर्चुअल असिस्टंट अँड मॉनीटरिंग, टेलीफोनीक व्हिडीओ कॉल सुविधा पुरविणे आवश्यक राहील, बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापनासाठी महानगर पालिका, अकोला यांनी नियुक्ती केलेल्या एजेन्सी सोबत करारानामा करुन घेण्यात यावा, संबंधीत कोविड केअर सेंटरवर जेवन बाहेरुन बोलविता येणार नाही,  प्रस्तावित करण्यात आलेल्या रुग्णालयाचे आजुबाजूचे रहीवासी यांची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, कोविड केअर सेंटर चालवित असतांना काही कायदेशिर बाबी उद्भवल्यास त्या आपल्या स्तरावरुन सोडविण्यात याव्यात. त्याकरिता शासन जबाबदार राहणार नाही, कोविड हॉस्पीटलने दैनदिन रुग्णाचा व संबंधीत माहिती पोर्टलवर कळविणे तसेच जिल्हा प्रशासनास कळविणे व विहित अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे कोविड केअर सेंटरला बंधनकारक राहील, तसेच N-95 मास्क, डिजिटल थर्मामिटर, अत्यावश्यक सेवा ह्या 24x7 पुरविणे आवश्यक राहिल, डेटीकेटेड कॉविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना ते घेत असलेल्या सोई सुविधांकरीता नियमानुसार माफक शुल्क आकारण्यांत यावे, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ