286 अहवाल प्राप्त; 78 पॉझिटीव्ह, 29 डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.22(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  286 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 208 अहवाल निगेटीव्ह तर 78 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 22 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6750(5542+1053+155) झाली आहे. आज दिवसभरात 13 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 36190 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  35260, फेरतपासणीचे 200 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 730 नमुने होते. आजपर्यंत एकूण 35595 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 30053  तर पॉझिटीव्ह अहवाल  6750(5542+1053+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 78 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 78 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 11 महिला व 30 पुरुष आहे. त्यात जीएमसी येथील पाच जण, पारस व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, अष्टविनायक कॉलनी, मोठी उमरी, शिवाजी नगर, जूने शहर व खडकी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रेल ता. अकोट, आळशी प्लॉट, संतोष नगर, गोकूल कॉलनी, महसूल कॉलनी, डाबकी रोड, संकल्प कॉलनी, बाळापूर, हरिहर पेठ, बार्शीटाकळी, चांदूर, अकोट, फीरदोस कॉलनी, चान्नी ता. पातूर, स्वराज्य पेठ, दहिगाव गावंडे, कौलखेड, अकोट फैल, राऊतवाडी व चोहट्टाबाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 14 महिला व 23 पुरुष  आहे. त्यातील जूना तारफैल येथील पाच जण, हरिहर पेठ  व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन जण, डाबकी रोड, खोलेश्वर व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शिवाजी नगर, गीता नगर, मोठी उमरी, माधव नगर, जून कापड मार्केट, बजरंग चौक, रेणूका नगर, रणपिसेनगर, बहीर गेट, गोकूल कॉलनी, देवराव बाबा चौकी, खडकी, जवाहर नगर, जयहिंद चौक, वानखडे नगर, देशमुख फैल, सिंधी कॅम्प, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, व गौरक्षण येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 22  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

दोन मयत

 दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात कौलखेड, अकोला येथील 72 वर्षीय महिला असून ती 6 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर सिव्हील लाईन, अकोला येथील  70 वर्षीय पुरुष  असून ते 15 सप्टेंबर रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

29 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच काल(दि.21) कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा जण, आर्युवेदीक महाविद्यालयातून आठ जण, होटल रिजेन्सी  येथून दोन जण, अशा एकूण 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

1747 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 6750(5542+1053+155) आहे. त्यातील 213 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4790 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1747 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ