राधाकृष्ण तोष्णिवाल आयुवेदिक महाविद्यालय व अनुसंधान केंद्र 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरु

 अकोला,दि. 18 (जिमाका)-  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अकोला येथील राधाकृष्ण तोष्णिवाल आयुर्वेदिक महाविद्यालय व अनुसंधान केंद्र येथे 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांनी दिले आहेत.

अकोला जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोविड-19 या विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आढळून येत आहे. या बाधित रुग्णांना सर्वापचार रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात येत आहे. परंतु तेथील उपलब्ध खाटांची संख्या कमी पडत असल्यामुळे अकोला येथील राधाकृष्ण तोष्णिवाल आयुर्वेदिक महाविद्यालय व अनुसंधान केंद्र अधिग्रहित करुन तेथे  100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे हे आदेश नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पारीत करण्यात येत असल्यामुळे तात्काळ प्रभावाने लागु करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ