अकोला,दि.1 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात आज दिवसभरात झालेल्या 105 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व पातूर येथे चाचण्या झाले
नाही. तर अकोट येथे 26 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आले. बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे सहा जणांच्या चाचण्या झाल्या त्यात
एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे सात चाचण्या झाल्या कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर
येथे 17 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही.
अकोला आयएमए येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला, तर 37 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या
त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे
दिवसभरात 105 चाचण्यांमध्ये पाच जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 12812 चाचण्या झाल्या
त्यात 748 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा