547 अहवाल प्राप्त; 226 पॉझिटीव्ह, 109 डिस्चार्ज, चार मयत

 


अकोला,दि.13(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 547 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 226  अहवाल निगेटीव्ह तर 226 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच  तर खाजगी लॅब मध्ये आज एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5614 (4514+945+155)  झाली आहे. आज दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 33243 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  32365, फेरतपासणीचे 193 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 683 नमुने होते. आजपर्यंत एकूण 32823 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28309    तर पॉझिटीव्ह अहवाल  5614 (4514+945+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 226 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरा 226 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 155 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 61 महिला व 94 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील त्यातील मुर्तिजापूर येथील 28 जण, चिखली ता. मुर्तिजापूर येथील 10 जण, तेल्हारा व केडिया प्लॉट येथील सात जण, डाबकी रोड, देशमुख फैल व जीएमसी हॉस्टेल येथील सहा जण, उमरी येथील चार जण, महसूल कॉलनी, मलकापूर, अडगाव, गौरक्षण रोड, खडकी, जठारपेठ येथील प्रत्येकी तीन जण, सातव चौक, सदरपूर, गाडेगाव ता. तेल्हारा, कौलखेड, गिता नगर, न्यु तापडीया नगर, अकोट, बापूनगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित खोलेश्वर, शासकीय वसाहत, न्यु राधाकिसन प्लॉट, दहिहांडा, वाडेगाव, गंगानगर, वरुर जळूका, आपातापा, संताजी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, वडद, नेर ता. तेल्हारा, शिवाजी नगर, राऊतवाडी, शंकरनगर, वडाळी देशमुख, रणपिसे नगर, हिवरखेड, मुंकूद नगर, राऊतवाडी, तोष्णीवाल ले आऊट, झोडगा ता. बाशीटाकळी, जवाहर नगर, कैलास नगर, गणोरी, भगवतवाडी, ज्योती नगर, अग्रवाल एक्सटेंशन, निमवाडी, वृंदावन नगर, बोर्टा, कान्हेरी सरप, धाबा,सिरसो, सत्यविजय अर्पाटमेन्ट, मोखा, राजूरा घाटे, गोरखेडी ता. मुर्तिजापूर, गायत्री नगर, शास्त्री नगर, खदान, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, माळीपूरा, जूने शहर व पवन चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 71 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 23 महिला व 48 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील  मुर्तिजापूर येथील 28 जण, सहकार नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच जण, डाबकी रोड, आदर्श कॉलनी व पोलिस रेल्वे क्वॉटर येथील प्रत्येकी तीन जण, खामखेडा, लहान उमरी व पैलपाडा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जीएमसी क्वॉटर, लोहारी ता. अकोट, मंगरुळ कांबे ता. मुर्तिजापूर, व्हिएचबी कॉलनी, जळगाव जामोद, मलकापूर, आळशी प्लॉट, वाशिम बायपास, जूना बाळापूर नाका, गड्डम प्लॉट, रचना कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, माळीपूरा, खदान, चिखली, पिंगळा ता. मुर्तिजापूर व अकोट रोड येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कृपया नोंद घ्यावी.

चार मयत

दरम्यान आज चार जणांचे मृत्यू झाले. त्यात अंकुर अर्पाटमेंट, सिटी कोतवाली, अकोला येथील 81 वर्षीय पुरुष असून तो दि. 9  सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, देशमुख फैल, रामदास पेठ, अकोला येथील 38 वर्षीय महिला असून ती 9 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर अकोट येथील 61 वर्षीय महिला असून ती 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच आज एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण आळशी प्लॉट येथील महिला असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

109 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 58 जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून 19 जण, कोविड केअर सेंटर, मुर्तिजापूर येथून 21 जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून 11 जणांना असे एकूण 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1207 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5614 (4514+945+155) आहे. त्यातील 181 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4226 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1207 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ