194 अहवाल प्राप्त; 20 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज, दोन मयत
अकोला,दि.1(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 194 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 174 अहवाल
निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि. 31) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 13 तर खाजगी लॅब मध्ये आठ
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4065 (3241+738+86)
झाली आहे. आज दिवसभरात
23 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 28047 जणांचे
नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 27309, फेरतपासणीचे
180 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 558 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 27837 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 24596 तर पॉझिटीव्ह अहवाल 4065 (3241+738+86) आहेत, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज
20 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
त्यात सात महिला व पाच पुरुष आहे. त्यात चांदुर येथील तीन जण, जीएमसी येथून दोन जण, तर उर्वरित राम नगर, खदान, अकोला जहॉगीर, हिंगणा
खदान, जयहिंद चौक, दहिगाव गावंडे व
अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे
रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन
महिला व सहा पुरुष आहे. जूने शहर येथील दोन जण तर उर्वरित गौरक्षण रोड, शिवाजी नगर, मुर्तिजापूर, ज्योती
नगर, सिसा ता.बार्शीटाकळी व नर्सिंग होस्टेल येथील रहिवासी
आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 13 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या
चाचण्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या चाचण्या
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, अकोला यांच्या मार्फत राबविण्यात येत
आहेत. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा
प्रशासनाने दिली आहे.
दोन मयत
दरम्यान आज दोन
जणाचे मृत्यू झाले. त्यात हातरुण, ता. बाळापूर
येथील 50 वर्षीय पुरुष असून तो दि. 27 ऑगस्ट
रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर मुर्तिजापूर येथील
80 वर्षीय पुरुष असून तो दि. 25 ऑगस्ट रोजी
दाखल झाला होता.त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
23 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 16 जणांना, उपजिल्हा
रुग्णालय, मुर्तिजापूर येथील पाच जण तर ओझोन हॉस्पीटल येथून दोन जण अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य
चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
658 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा