विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत

        अकोला,दि.18(जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाचे व मा. मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य उपरोक्‍त पत्रान्‍वये दिनांक १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला असून सुधारीत कार्यक्रमाचे सविस्‍तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

             उपक्रम मतदार केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे दुबार/समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील त्रृटी दुर करणे (यादी भागातील दुबार/समान नोंदी संदर्भातील त्रृटी दि. ३१.०८.२०२० पर्यत करणे) विभाग/भाग पुन्‍हा तयार करणे आणि मतदानाच्‍या क्षेत्राच्‍या/भागांच्‍या सीमेच्‍या पुनर्रचनेचे प्रस्‍ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्रांची यादी मंजूर करणे. कालावधी दि. ३० सप्‍टेंबर २०२० (बुधवार) ते दि.३१ ऑक्‍टोबर, २०२० (शनिवार). नमुना 1 ते 8 तयार करणे पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप यादी तयार करणे. दि. 1 नोव्‍हेंबर २०२० (रविवार) ते दि. १५ नोव्‍हेंबर, २०२० (रविवार). एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे दि. १६ नोव्‍हेंबर २०२० (सोमवार). दावे व हरकती स्विकारण्‍याचा कालावधी दि. १६ नोव्‍हेंबर,२०२० (सोमवार) ते दि. १५ डिसेंबर, २०२० (मंगळवार). विशेष मोहिमेचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्‍याच्‍या कालावधीत, मुख्‍य निवडणुक अधिकारी, महाराष्‍ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार. दावे व हरकती निकालात काढणे दि. ०५ जानेवारी २०२१ (मंगळवार) पर्यत. प्रारुप मतदार यादीच्‍या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दी करिता आयोगाची परवानगी घेणे. डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे दि. १४ जानेवारी २०२१ (गुरुवार) पर्यत. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दीकरणे दि. १५ जानेवारी, २०२१ (शुक्रवार).

            वर दर्शविलेल्‍या कार्यक्रमानुसार अकोला जिल्‍हयातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्‍ट करणे. नाव वगळणे ईत्‍यादी करिता मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO)‍ यांचेकडे आवश्यक फार्म भरुन देण्यात यावे मतदार यादीतील दुबार, स्थालांतरित,मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुध्दा प्रस्तृत  मोहिमत घेण्यात येणार आहे. तरी अकोला  जिल्हयातील सर्व संबंधीतांनी याबाबत आपले विहित नमुन्यातील अर्ज  भरुन मतदान  केंद्रस्तरीय ‍ अधिकारी (BLO)‍ यांचे मार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे देण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी  तथ जिल्हा निवडणूक अधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ