अकोला,दि. 6 (जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज
दिवसभरात झालेल्या 67 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर, पातूर,
तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. बार्शीटाकळी
येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाले नाही, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथे तीन चाचण्या झाल्या
त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 59 वैद्यकीय
कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे दिवसभरात 67 चाचण्यांमध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर
आजपर्यंत 13707 चाचण्या झाल्या त्यात 800 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत,
असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा