रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 92 चाचण्या, सहा पॉझिटिव्ह


अकोला,दि. 13 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज दिवसभरात झालेल्या 92 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, पातूर, बाळापूर, तेल्हारा, व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आले नाही, तसेच अकोला मनपाआयएमए अकोला येथे चाचण्या झाल्या नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे 14 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 72  वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे दिवसभरात 92 चाचण्यांमध्ये  सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14725 चाचण्या झाल्या त्यात 959 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ