'नो मास्क,नो सर्व्हिस' अंतर्गत जिल्ह्यात मास्कचा वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही

अकोला,दि. 29 (जिमाका)- कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाद्वारे संपूर्ण जिल्ह्यात 'नो मास्क, नो सर्व्हिस' अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मास्क न वापर करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. 

अकोला महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्हा प्रशासन अधिकारी व महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोहीम राबवली. तसेच मास्क वापर करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती व सर्वसामान्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार ही यावेळी करण्यात आला.  जिल्ह्यात जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामीण स्तरावर ही मोहीम राबविण्यात आली. 

जिल्ह्यात 534 व्यक्तींवर मास्कचा वापर न केल्यामुळे प्रत्येकी दोनशे प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली यात अकोला तालुक्यात 286, अकोट तालुक्यात 48 तेल्हारा येथे 63 बाळापूर येथे 11 पातूर येथे 32 मूर्तिजापूर येथे 52 तर बार्शिटाकळी येथे 22 व नगर परिषद परिसरात 20 याप्रमाणे 534 व्यक्तींकडून एक लक्ष सहा हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ