दिव्यांगाना सर्व योजनेचा लाभ द्या;जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 



अकोला,दि.23(जिमाका)-  राज्यशासन व केन्द्रशासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनेचा एकत्रीकरण करुन सर्व योजनेचा लाभ दिव्यागांना द्या तसेच शासनाच्या सूचनेनुसार सामुहिक व वैयक्तीक लाभाच्या योजना दिव्यांगापर्यंत पोहचवा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सबंधित अधिकारी यांना निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीत दिव्यांगासाठी असलेल्या पाच टक्के निधीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी रामेश्वर वसतकर आदी उपस्थित होते.

            शासनाच्या विविध योजनाची सांगड घालून दिव्यांगाना रोजगार व उद्योग मिळवून द्यावा. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे दिव्यांगाच्या कल्याणसाठी पाच टक्के निधी उपलब्ध असतो. त्यानिधीचा उपयोग दिव्यांगाच्या कल्याणासाठी करावा. तसेच प्रत्येक दिव्यांगाना युआयडीआय कार्ड पुरविण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना जिल्हाधिकारी  यांनी दिल्यात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ