विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा


        


        अकोला,दि.11(जिमाका)- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत आज सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला.

        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. फारुखी, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, वैद्यकीय अधिकारी सिरसाम आदी उपस्थित होते.

        यावेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ या संदर्भात आढावा घेतला. ऑक्सीजन व व्हेंटीलेटर यांच्या उपलब्धेतेबाबत आढावा घेवून आवश्यकतेनुसार ऑक्सीजन व व्हेटीलेटरची पुरविण्याबाबत सूचनाही दिल्यात. तसेच वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या पाहता पर्यायी व्यवस्था करावी. जिल्हा स्त्री रुग्णालय येथील नवीन इमारतीमध्ये कोविड रुग्णांना उपचाराकरीता आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करावे.  मागील काहि दिवसात जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्ण संख़्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त करुन कोरोना रुग्णाचा शोध घेवून त्याला थोपविण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील शोध घ्यावा. यासाठी रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढविण्याचे सूचना त्यांनी दिल्यात.

            जिल्हयामध्ये चालू असलेल्या सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाबाबत आढावा घेवून ग्रामीण भागामध्ये सिरॉलॉजिकल सर्वे करण्याचे सूचना त्यानी दिल्यात. अतिधोक्याच्या रुग्णाना प्लॉझमा थेरपी देवून मृत्यू दर कमी करण्याचे सूचना वैद्यकीय अधिकारी यांना दिल्यात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ