378अहवाल प्राप्त; 117 पॉझिटीव्ह, 29डिस्चार्ज, दोन मयत

 अकोला,दि.21(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  378 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 261 अहवाल निगेटीव्ह तर 117 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एका जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5464+1031+155=6650 झाली आहे. आज दिवसभरात 29 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 35909 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  34987, फेरतपासणीचे 200 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 722 नमुने होते. आजपर्यंत एकूण 35309 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 29845  तर पॉझिटीव्ह अहवाल  5464+1031+155=6650आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 117 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 117 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 69 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 21 महिला व 48 पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 13 जण, जठारपेठ, डापकीरोड, प्रसाद कॉलनी येथील प्रत्येकी पाच, निमवाडी येथील चार जण,जुने शहर येथील तीन, तुकाराम चौक, खोलेश्वर, आनंदनगर सिंधी कॅम्प  येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित कृषी नगर, शिवर-शिवणी, तारफैल, कमला नगर, वानखडे नगर, महाराजा अग्रसेन भवन जवळ, कमला प्लॉट, कान्हेरी गवळी, अकोट, चोहट्टा बाजार, पळसो बढे, दुर्गा चौक, खिरपुरी खुर्द, शरद नगर, अकोला, तिवसा, झोडगा, राधेनगर, पिंजर, रामनगर, रतनलाल प्लॉट, मलकापूर रोड, दहातोंडा, हातगाव, राजुरा घाटे, सांगवा मेळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आज संध्याकाळी 48  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 14 महिला व 34 पुरुष आहे. त्यात न्यु खेतान नगर व जठारपेठ येथील चार जण, डापकी रोड येथील तीन,  लक्ष्मी नगर मोठी उमरी, खडकी, आदर्श कॉलनी, मलकापूर रोड, चांदुर, रामनगर,  कॉग्रेस नगर येथील दोन जण, तर उर्वरित सुधीर कॉलनी, राधे नगर, रेल ता. अकोट, गंगावल, आळशी प्लॉट, दहिगाव गावंडे, डॉक्टर कॉलनी मलकापूर, नांदगाव ता. बाळापूर, तेल्हारा, कौलखेड जहागीर, कैलास टेकडी, गजानन नगर, सिधी कॅम्प, शिवणी, मोठी उमरी, झोडगा, पत्रकार कॉलनी, गोकुळ कॉलनी, तुकाराम चौक, गवळी पुरा, बलोदे ले-आऊट, जीएमसी व राजुरा सरोदे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये एका  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

दोन मयत

  दरम्यान आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 2 व्यक्तींचा मुत्यू झाला. यात विठ्ठल नगर उमरी,  येथील 68 वर्षीय महिला  असुन,  त्यांना 15 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते  त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. शिवाजी नगर, अकोला येथील 54 वर्षीय पुरूष असुन,  त्यांना 15 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला.

29 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1678 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5464+1031+155=6650आहे. त्यातील 211 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4761 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1678 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ