खाजगी रुग्णालयातील कोविड-19 च्या रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या शुल्क तपासणीसाठी ऑडीटरची नियुक्ती

अकोला,दि.21 (जिमाका)- खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये उपचार घेत असलेल्‍या कोविड बाधित रुग्‍णांकडूनICMR  तसेच  शासनाने  विहीत केलेल्‍या दराने  शुल्‍क आकारण्‍यात येत आहे किंवा कसे  या बाबतची  तपासणी करण्‍याकरिता ऑडीटरची नियुक्ती जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांनी केली आहे.

अ.क्र.

अधिकारी / कर्मचारी यांचे नांव व कार्यालय

पदनाम

तपासणी करावयाचे  खाजगी रुग्‍णालय

श्री. सरकटे , कोषागार कार्यालय अकोला 

लेखाधिकारी

आयकॉन  हॉस्‍पटीटल  केडीया प्‍लॉट, अकोला

डी.के. संघई , नियोजन कार्यालय अकोला

लेखाधिकारी

ओझोन हॉस्‍पटीटल  केडीया प्‍लॉट, अकोला

श्री. किशोर फुंडकर , शिक्षण विभाग, जिल्‍हा परिषद अकोला

लेखाधिकारी

युनिक हॉस्‍पटील, अकोला वाशिम बायपास अकोला व  हॉटेलरणजित, नविन बस स्‍टॅन्‍ड जवळ अकोला

श्री. बी.के. कदम, लोकल फंड अकोला

लेखाधिकारी

हॉटेल रिजेन्‍सी नविन बस स्‍टॅंड जवळ अकोला

श्री. विवेक करमरकर, कोषागार कार्यालय अकोला

लेखाधिकारी

हॉटेलस्‍कायलार्क, श्रावगी प्‍लॉट अकोला  अकोला अॅक्‍सीडेंट क्लिनीक हॉस्‍पीटल, मुर्तिजापुर रोड अकोला

श्री. कोरडे, उप कोषागार कार्यालय मुर्तिजापुर

उप कोषागार अधिकारी

बाबन हॉस्‍पटील मुर्तिजापुर  अवघाते हॉस्‍पटील मुर्तिजापुर

 

उपरोक्‍त प्रमाणे नियुक्‍त केलेल्‍या अधिकारी / कर्मचारी यांनी संबंधीत रुग्‍णायामध्‍ये भरती झालेल्‍या तसेच डीस्‍चार्ज झालेल्‍या रुग्‍णांना विविध उपचाराकरिता आकारण्‍यात आलेल्‍या शुल्‍काबाबत संबंधीत रुग्‍णालयाने जतन केलेल्‍या रेकॉर्डची आवश्‍यक ती तपासणी करावी.   तसेच  केलेल्‍या तपासणीचा दैनंदिन अहवाल विहीत नमून्‍यात  निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा अपर जिल्‍हादंडाधिकारी यांचेकडे न चुकता दुपारी १२.०० वाजेपर्यंत सादर करावा. सदर आदेश नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यांतर्गत पारीत करण्‍यात येत असल्‍यामुळे तात्‍काळ लागू करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी यांनी  आदेशाव्दारे कळविले आहे.

                                                                                    0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ