रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 34 चाचण्या, एक पॉझिटिव्ह

 


अकोला,दि. 20 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज दिवसभरात झालेल्या 34 चाचण्या झाल्या त्यात एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर,बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा, व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 34 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला मनपा, अकोला आयएमएशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज चाचण्या झाल्या नाही, असे दिवसभरात  34 चाचण्यांमध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 15760  चाचण्या झाल्या त्यात 1062 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ