महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती व बालकल्याण पुरस्कार

 


 

          अकोला,दि.13(जिमाका)- केन्द्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार हा ज्या मुलांनी (वय पाचपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे अशाना दिला जातो.

            बालकल्याण पुरस्कार हा वैयक्तीक व संस्था स्तरावर दिला जातो. वैयक्तीक पुरस्काराकरीता मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. तर संस्था स्तराकरीता बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यापूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

            बाल शक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार सन 2021 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत मंगळवार (दि. 15) पर्यंत आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ