रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 149 चाचण्या, 28 पॉझिटिव्ह

 


अकोला,दि. 16 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज दिवसभरात झालेल्या 149 चाचण्या झाल्या त्यात 28 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण व पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर अकोट येथे 37 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथील दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 30 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच अकोला मनपा व शासयकी वैद्यकीय महाविद्यालय येथे चाचण्या झाल्या नाही, तर अकोला आयएमए येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 65 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे दिवसभरात  149 चाचण्यांमध्ये  28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 15232  चाचण्या झाल्या त्यात 1015 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ