निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुंन्हेगारी पार्श्वभुमिची प्रसिध्दी

 

अकोला,दि.21(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 11 सष्टेंबर, 2020 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये खालील प्रमाणे प्रसिध्दी देण्यात आली आहे.

        भारत निवडणूक आयोगाने नवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिध्दी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक 10.10.2018 6.03.2020 रोजी निर्गमित केलेल्या तपशीलवार सूचनांच्या अनुषंगाने आयोगाने दिनांक 11 सष्टेंबर, 2020 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधीत उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभुमी प्रसिध्दी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणूकीय लोकशाहीच्या सर्वंगीण विकासासाठी/उन्न्तीसाठी या नैतिक बाबीवर जार दिली आहे.

        सुधारीत सूचनांचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. प्रसिध्दीसाठी सुधारित वेळापत्रक

सुधारीत दिशानिर्देशानुसार उमेदवारांनी, तसेच त्यांना नामनिर्देशित केलेल्या राजकीय पक्षांनी संबंधीत उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर पुढील प्रमाणे प्रसिध्द करतील.

        प्रथम प्रसिध्दी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या 4 दिवसामध्ये

        दुसरी प्रसिध्दी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या 5 व्या ते 8 व्या दिवसांमध्ये

        तिसरी प्रसिध्दी : 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यत (म्हणजेच मतदान होण्याच्या 2 दिवस अगोदर)

हे वेळापत्रक मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकारी चांगल्या माहितीच्या आधारे उपयोगत आणण्यास मदत करेल.

            बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षाच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की, बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय यांनी सुध्दा इतर उमेदवार व राजकीय पक्षांसाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील प्रसिध्द करतील.

            आयोगाने ठरविल्यानुसार, आता पर्यत प्रसिध्द करण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन भागधारकांच्या हितासाठी प्रकाशित केले जात आहे. हे मतदार इतर भागधारकांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यात मदत करेल. या संदर्भातील सर्व सूचना, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देर्शित करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजेत. या सुधारित सूचना तात्काळ प्रभावाने लागू होतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ