एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुल मागील सत्रातील गुणाच्या आधारे आदिवासी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश
अकोला,दि.1(जिमाका)- आदिवासी विद्यार्थ्यांना
एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठीची परिक्षा कोरोनाच्या
प्रार्दुभावामुळे रद्द झाल्यामुळे प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला याच्या कार्यक्षेत्रातील अकोला,
बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित
आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा
तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2019-20 या शैक्षणिक
वर्षामध्ये पाचवी, सहावी, सातवी, आठवी व नववी मध्ये शिकत असलेल्या
अनुसूचित जमातीचे विद्यार्थी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत
त्यांच्या मागील सत्रातील गुणाच्या आधारे विद्यार्थ्यांची
निवड होणार आहे.
सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरले आहे. त्यांनी आता पाचव्या वर्गातील प्रथम सत्राचे
गुणभरण्याचे निर्देश शासनाकडुन दिले आहे. हाच निष्कर्ष सातवी, आठवी
व नववी रिक्त जागेवरील प्रवेशासाठीही लागु करण्यात आलेला आहे.
मागील सत्रातील एकदर 900 पैकी विद्यार्थ्यांनी किती गुण
मिळविले त्या आधारे निवड यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या
गुणाऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही यांची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांच्या
अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामध्ये दिलेला संपर्क किवा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. विद्यार्थ्याची
जन्म तारीख आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम
सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे. (स्कॅन
केलेली गुणपत्रेकेची प्रत png,jpeg,jpg,pdf हया
स्वरुपात असावी.) शाळेतील
एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदपत्र भरलेले असतील, तर
प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रक
स्वतंत्र अपलोड करावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा