238 अहवाल प्राप्त; 128 पॉझिटीव्ह, 77 डिस्चार्ज, तीन मयत

 


अकोला,दि.16(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 238 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 110 अहवाल निगेटीव्ह तर 128 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज तीन मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि. 15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5939 (4810+974+155)  झाली आहे. आज दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 33947 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  33055, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 697 नमुने होते. आजपर्यंत एकूण 33449 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28639 तर पॉझिटीव्ह अहवाल  5939 (4810+974+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 128 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरा 84 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 38 महिला व 43 पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 13 जण, खामखेड येथील सात जण, चान्नी येथील पाच जण, जयहिंद चौक,तोष्णीवाल लेआऊट व जठारपेठ येथील प्रत्येकी चार जण, अकोट, खडकी, डाबकी रोड व अंबुजा फक्टरी कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन जण, लहान उमरी, कौलखेड, खेतान नगर, शिवापूर, बापू नगर व पातूर  येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित अमृतवाडी, जीएमसी, स्वराज्य पेठ, नेहरु नगर, कोठारी वाटीका, नानक नगर, बंजारा नगर, जूने शहर, दहिहांडा, न्यु तारफैल, आपातापा, लसणापूर ता. मुतिजापूर, गिता नगर, शिर्ला, रेणूका नगर, शिव नगर, देशमुख फैल, मजलापूर ता. पातूर, तांदळी ता. पातूर, सिंधीकॅम्प, पारस, चौरेप्लॉट, सहनगाव अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व ३० पुरुषांचा समावेशआहे.  त्यातील  मुर्तिजापूर येथील ३३ जण, जीएमसी येथील तीन जण, तर उर्वरित पडोळे लेआऊट, सिंधी कॅम्प, तारा बिल्डिंग,पत्रकार कॉलनी, शिरसोली, लहान उमारी, करतवाडी व सोनोरी ता.मुर्तिजापूर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

तीन मयत

दरम्यान आज तीन जणांचे मृत्यू झाले. त्यात  जैनपूर पिंपळी, ता. अकोट येथील ८९ वर्षीय पुरुष  असून तो ८ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू  झाला, लहान उमरी, अकोला येथील ७५ वर्षीय महिला असून ती १५ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर  करारवाडी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष  असून तो १६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू  झाला.

77 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४० जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून १४ जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जण, ओझोन हॉस्पीटल येथून चार जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून पाच जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून  एक जण, कोविड केअर सेंटर,अकोट येथून पाच जणांना असे एकूण ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1257 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5939 (4810+974+155) आहे. त्यातील 192 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4490 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1257 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ