तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

 

अकोला,दि.1 (जिमाका)- मोटार वाहन निरिक्षक यांच्या मार्फत  जिल्ह्यातील तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक व अनुज्ञप्ती याकरीता शिबिराचे आयोजन सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये  होणार आहे. या नियोजीत शिबीर सप्टेंबर महिण्यात बाळापूर येथे  दि. 4 व 18 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 8 व 22 रोजी, अकोट येथे दि. 14 व 25 रोजी तर तेल्हारा येथे दि. 7 व 16 रोजी होईल. ऑक्टोंबर महिण्यात बाळापूर येथे  दि. 5 व 20 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 7 व 22 रोजी, अकोट येथे दि. 12 व 26 रोजी तर तेल्हारा येथे दि. 19 व 28 रोजी होईल. नोव्हेंबर महिण्यात बाळापूर येथे  दि. 6 व 20 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 11 व 23 रोजी, अकोट येथे      दि. 17 व 26 रोजी तर तेल्हारा येथे दि. 5 व 19 रोजी होईल. तर डिसेंबर महिण्यात बाळापूर येथे  दि. 4 व 18 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 9 व 23 रोजी, अकोट येथे दि. 15 व 28 रोजी तर तेल्हारा येथे दि. 8 व 24 रोजी होईल, असे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना