रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 146 चाचण्या, 41 पॉझिटिव्ह

 

अकोला,दि. 27 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 146 चाचण्या झाल्या त्यात 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला ग्रामिण येथे 45 चाचण्या झाल्या त्यात 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 66 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 26 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 146 चाचण्यांमध्ये 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16946 चाचण्या झाल्या त्यात 1184 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ