ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

 

          अकोला,दि.18(जिमाका)- जिल्‍हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोलाचे वतीने   ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयेाजन दिनां‍क 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर  या कालावधीत करण्‍यात आलेले आहे.         

                        सदर मेळाव्‍यामध्‍ये  नामांकित खाजगी उद्योजक / कंपनी / त्‍यांचे प्रतिनिधी एकुण 200  पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील. तसेच पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्‍या ऑनलाईन मुलाखती घेण्‍यात येतील व पात्र उमेदवारांची  निवड करण्‍यात येईल .

                        कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या -  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव  नोंदणी केलेल्‍या दहावी/ बारावी / पदवी / नर्सिंग पदवीका (ए.एन.एम./जी.एन.एम.) /आयटीआय पास / पदवीत्‍तर , पुरुष / महिला  उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्ड चा वापर करुन ऑनलाईन आपले लॉगइन मधुन ऑनलाईन अर्ज ( Apply ) करुन यात सहभागी होऊन रोजगार प्राप्‍त करण्‍याची संधी उपलब्‍ध झालेली आहे . या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरून आपल्‍या सेवायोजन ( एम्‍लॉयमेंट ) कार्डचा  युझर आयडी व पासवर्ड चा वापर करुन आपल्‍या लॉगइन मधुन ऑनलाईन  रोजगार मेळाव्यात आँनलाईन  पद्धतीने सहभागी होऊ शकतात.          

                        पात्र असलेल्‍या पुरुष / महिला उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणीक पात्रतेच्‍या आधारे एका पेक्षा जास्‍त पदांकरीता सुध्‍दा ऑनलाईन अर्ज ( Apply ) करु शकतात तरी दिनांक 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2020 कालावधी दरम्‍यान  आपल्‍या सेवायोजन कार्डच्‍या युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइन मधुन ऑनलाईन अर्ज ( Apply ) करावे तसेच ऑनलाईन अर्ज ( Apply ) करतांना काही अडचण आल्‍यास जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला .या  कार्यालयाशी प्रत्‍यक्ष अथवा साधावा असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्‍त श्रीमती प्रां.यो.बारस्‍कर यांनी केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ