411 अहवाल प्राप्त; 145 पॉझिटीव्ह, 159 डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.11(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 411 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 266  अहवाल निगेटीव्ह तर 145 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 17  तर खाजगी लॅब मध्ये आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5282 (4202+933+147)  झाली आहे. आज दिवसभरात 159 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 32307 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 31448, फेरतपासणीचे 189 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 670 नमुने होते. आजपर्यंत एकूण 31917 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 27715  तर पॉझिटीव्ह अहवाल  5282 (4202+933+147) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 145 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरा 145 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 81 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 28 महिला व 53 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील पिंजर येथील सात जण, दापूरा व मोठी उमरी येथील प्रत्येकी सहा जण, नागे लेआऊट येथील पाच जण, श्रावंगी प्लॉट, बार्शिटाकळी व रेवदा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी चार जण, कौलखेड, मलकापूर, गणेश नगर व रिंग रोड येथील तीन जण, खडकी, जवाहर नगर व पिंपळगाव चंभारे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित आदर्श कॉलनी, आळंदा ता. बार्शिटाकळी, आगर, शिवनी, मुर्तिजापूर, खिक्रीयन कॉलनी, अन्वी मिर्जापूर, लहान उमरी, मरोडा ता. अकोट, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, जीएमसी, डाबकी रोड, जूने शहर, तुंलगा ब्रू. ता. पातूर, सुधीर कॉलनी, वृंदावन कॉलनी, बेलखेड ता. तेल्हारा, गौरक्षण रोड, जठारपेठ, गोरेगाव, दत्त कॉलनी, देवी खदान, यागाचौक, पारस, चान्वी, आरटीओ रोड व जामवसू ता. बार्शिटाकळी प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 64 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 32 महिला व 32 पुरुष  आहे. त्यातील दहिगाव येथील नऊ जण,डाबकी रोड व गौरक्षण रोड येथील प्रत्येकी सहा जण, कौलखेड, लहान उमरी व जूने शहर येथील चार जण, उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन जण, देशमुख फैल, सिसा ता. बार्शिटाकळी, खेमका सदन, गितानगरवाडेगाव, मोठी उमरी व राऊतवाडी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित तोष्णीवाल लेआऊट, बालाजीनगर, महान, कळंबा, जीएमसी, दुर्गाचौक, वडाळी देशमुख, जूना कपडा बाजार, माधव नगर, आळसी प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, कृपया नोंद घ्यावी.

दोन मयत

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात चिखलगाव ता. पातूर येथील 75  वर्षीय पुरुष असून तो दि. 8 सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर पोळा चौक, जूने शहर, अकोला येथील 70 वर्षीय महिला असून ती दि. 7 सप्टेंबर  रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

159 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 48 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 35 जणांना,उपजिल्हा रुग्णालयातून 10 जणाना, आयकॉन हॉस्पीटल व  ओझोन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून 47 जणांना तर कोविड केअर सेंटर, बार्शिटाकळी येथून 17 जणांना अशा एकूण 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1090 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5282 (4202+933+147) आहे. त्यातील 175 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4017 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1090 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा