रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 164 चाचण्या, नऊ पॉझिटिव्ह


अकोला,दि.2 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 164  चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर अकोट येथे 41 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे आठ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोला मनपा येथे 57 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला आयएमए येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला, तर 41 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 164 चाचण्यांमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 12976 चाचण्या झाल्या त्यात 757 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना