मंगळवारी पुशधनाचा लिलाव

 


अकोला,दि. 25 (जिमाका)-  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, मुर्तिजापूर रोड, कृषिनगर, अकोला येथील पुर्णाथडी म्हैस प्रक्षेत्र येथे मंगळवार (दि.29) रोजी सकाळी 11 वाजेपासून निवडक म्हैसवर्गीय जनावरांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. जनावरे पाळण्यास इच्छुक असलेले पशुपालक, शेतकरी हे सातबारा उताऱ्याची व आधारकार्डची प्रत सादर करुन तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या विविध नियमांचे पालन करुन या लिलावात सहभाग घेऊन जनावरे खरेदी करु शकतात.

            शेतकरी, पशुपालक व दुग्धव्यावसायिक यांनी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या विविध नियमांचे पालन करीत या लिलावात सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच लिलावाविषयी शंका-समाधानासाठी 9552794560 किवा 9860365002 (डॉ. दिलीप बदुकले) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ