रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 140 चाचण्या, सात पॉझिटिव्ह


अकोला,दि. 23 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 140 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे 17 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अकोट येथे 19 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  बाळापूर येथे आज चाचण्या झाल्या नाही, बार्शीटाकळी येथे 12 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  पातूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 18 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  मुर्तिजापूर  येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 50 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात त्यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11 चाचण्या झाल्या त्यापैकी  तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात  140 चाचण्यांमध्ये  सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16314 चाचण्या झाल्या त्यात 1099 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ