कोविड-19 च्या अनुषंगाने परवानगी प्रदान करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सुचना

 अकोला,दि. 18 (जिमाका)- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात शासनाचे धोरण तसेच ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार शुल्क आकारणी करुन सी.सी.सी. व सी.सी.एच.सी. म्हणून खाजगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे.

कोविड-19 च्या अनुषंगाने परवानगी प्रदान करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सुचना

भरती होणाऱ्या रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. डेडीकेटेड कोविड  हॉस्पीटल केन्द्रामध्ये आयसीएमआर व राज्य आरोग्य व कुंटूब कल्याण विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. परवानगी दिलेल्या कोविड केअर सेंटर यांनी सर्वापचार रुग्णालयात एकही बेड शिललक नसल्यास अशा रुग्णांसाठी 30 टक्के बेड उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहिल.  कोविड बाधित उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा तसेच आवश्यकतेप्रमाणे ऑक्सीजन व व्हेन्टीलेटर उपलब्ध ठेवण्यात यावा. भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिवसातून तीन वेळा रुग्णांच्या स्थिती बाबत कळविण्यात यावे.

भरती होणाऱ्या रुग्णांची यादी दर्शनी भागावर लावण्यात यावी. रुग्णालयांची तपासणी करण्याकरीता आलेल्या शासकीय अधिकारी/ऑडीटर यांना तपासणी करीता दस्तऐवज उपलब्ध करुन देण्यात यावे. आयसीएमआर व राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन दयावे, या सेंटरमध्ये रुग्णांचे उपचारार्थ लागणारा पुरेशा प्रमाणातील तज्ञ डॉक्टर, कर्मचारी व अधिकारी वर्ग 24x7 नियमीतपणे उपस्थित ठेवावा लागेल. पल्स ऑक्झीमिटर व्हर्चुअल असिस्टंट अँड मॉनीटरिंग, टेलीफोनीक व्हिडीओ कॉल सुविधा पुरविणे आवश्यक राहील,

 बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापनासाठी महानगर पालिका, अकोला यांनी नियुक्ती केलेल्या एजेन्सी सोबत करारानामा करुन घेण्यात यावा, संबंधीत कोविड केअर सेंटरवर जेवन बाहेरुन बोलविता येणार नाही,  प्रस्तावित करण्यात आलेल्या रुग्णालयाचे आजुबाजूचे रहीवासी यांची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, सुरक्षतेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता 24 बाय 7 सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. कोविड केअर सेंटर चालवित असतांना काही कायदेशिर बाबी उद्भवल्यास त्या आपल्या स्तरावरुन सोडविण्यात याव्यात. त्याकरिता शासन जबाबदार राहणार नाही,कोविड केअर सेंटरवर जेवण बाहेरुन बोलाविता येणार नाही.

 कोविड हॉस्पीटलने दैनदिन रुग्णाचा व संबंधीत माहिती पोर्टलवर कळविणे तसेच जिल्हा प्रशासनास कळविणे व विहित अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे कोविड केअर सेंटरला बंधनकारक राहील,  असे जिल्हाधिकारी यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ