आंतरजिल्हा खाजगी प्रवासी बसेससाठी कार्यपध्दती
अकोला,दि.2 (जिमाका)- आतंरजिल्हा प्रवाशांच्या
प्रवासासाठी मानक
कार्यपध्दती (Stardard Operating Procedure i. e. SOP) च्या
अटी व शर्तीच्या अधीन राहून निर्बंध
दूर करण्यात आले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी
कळविले आहे.
खाजगी प्रवासी बस
ऑपरेटर यांनी कोविड-१९ महामारीच्या प्रार्श्र्वभुमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेस परिवहन विभागाने निगमीत केलेल्या
निर्देशांचे तंतोतत पालन करावे, महाराष्ट्र मोटार वाहन नियम
१९८९ च्या नियम २० (१) (x) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकोकरण केल्याच्या
स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातुन प्रवास
करणार पर्यटक गट
बदलतांना
तसेच प्रवाश्यांच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतूकीकरण
करावे. तसेच कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी
बसचे निर्जंतूकीकरण करावे, बसचे आरक्षण
कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी
स्वच्छता करावी. तसेच या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असतांना मास्क, सैनिटायझर चा वापर करावा,
बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी
घ्यावी, मास्क परिधान न केलेल्या प्रवाश्यांना बसमध्ये
प्रवेश देवू नये. बसच्या प्रवेश
द्वाराजवळ संनिटायझर ठेवण्यात यावे, तसेच
बसमध्ये प्रवाश्याच्या वापरासाठी काही
अंतिरिक्त मास्क ठेवण्यात यावे, बसमध्ये
प्रवास करणाऱ्या प्रवाशांची थर्मल
गनद्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी,
खोकला इत्यादी प्रकारची कोविड-१९ आजाराची
प्राथमीक लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बस मधुन प्रवास
करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, कंत्राटी बस (सिंटीग) वाहनामध्ये प्रवासी एकाआड एक पध्दतीने
आसनस्त होतील अशा प्रकारे प्रवासी वाहतुकीस परवानगी असेल.
स्लिपर वस वाहनामध्ये डबल बर्थंवर एक प्रवाशी तसेच स्वतंत्र
सिंगल बर्थ वर एक प्रवाशी या प्रमाणे वाहतूकीस परवानगी असेल, चालकाने प्रवासा दरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधन गृहाचा वापर या कारणाकरिता बस
थांबविताना
ही ठिकाणे स्वच्छ आहेत खात्री करावी, बसमध्ये चढतांना व उतरतांना तसेच खानपानाकरिता व प्रसाधन गृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान
बस थांवविली असतांना प्रवासी शारिरिक अंतर (Social
Distancing)
पाळतील
याची दक्षता घ्यायी, प्रवाशांना बसमध्ये
कचरा फेकू देवू नये, त्यांना कचरा कुंडीचा वापर करण्याच्या व बस
स्वच्छ
राहण्याच्या सुचना देण्यात याव्यात,
प्रवासी बसचे निर्जंतूकीकरण करणे तसेच त्यांचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवाना धारकाची असेल.
वरील सूचनांचे पालन न
केल्यास परवाना धारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम १९८८ चे,
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९. आपत्ती
व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी नुसार उचित कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, केंद्र व राज्य शासनाकडून
वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा