रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 105 चाचण्या, 12 पॉझिटिव्ह
अकोला,दि.4 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 105 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण येथे 58 चाचण्या
झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे 15
चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर
येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे दोन चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, तर पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तसेच अकोला मनपा
येथे चाचण्या झाले नाही, अकोला
आयएमए येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आठ चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 15 वैद्यकीय
कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 105 चाचण्यांमध्ये
12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 13543 चाचण्या झाल्या त्यात 794 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा