डाक कार्यालयामार्फत विविध सेवासुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

 


अकोला,दि. 30 (जिमाका)- अकोला जिल्ह्यातील डाक कार्यालयामार्फत जवळपास 73 सेवा देणारे कॉमन सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन प्रवर डाक अधिक्षक एस.बी. लिंगायत यांचे हस्ते करण्यात आले. नागरिकांना विविध सेवा सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी डाक विभाग सदैव अग्रेसर असतो, यात नवीन आधार नोंदणी किवा आधार दुरुस्ती केन्द्र, सर्व बँकींग सुविधा देणारे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, पीक विमा, पंतप्रधान आवास योजना, पॅनकार्ड, आयटी रिर्टन्स, एनपीएस,  मोबाईल रिचार्ज, वाहनधारकांसाठी फास्ट टँग इत्यादी सारख्या विद्यार्थ्यांपासून तर थेट शेतकऱ्यांपर्यंत सगळयांच्या गरजेप्रमाणे जवळपास 73 सेवासुविधा आपल्या जवळच्या डाक कार्यालयात देण्यात येणार आहेत. अकोला डाक विभागातील अकोला मुख्य डाकघर, अकोला सिटी, ताजनापेठ, जठारपेठ, पातूर, बाळापूर, मंगरुळपीर, मुर्तिजापूर, तेल्हारा व अकोट या निवडक डाक कार्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे. तरी सर्व सामान्य नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाव्दारे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ