316 अहवाल प्राप्त; 83 पॉझिटीव्ह, 53 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.7(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 316 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 233  अहवाल निगेटीव्ह तर 83 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन तर खाजगी लॅब मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.   त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4700 (3793+793+114)  झाली आहे. आज दिवसभरात 53 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 30636 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 29824, फेरतपासणीचे 185 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 627 नमुने होते. आजपर्यंत एकूण 30353 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 26560 तर पॉझिटीव्ह अहवाल  4700 (3793+793+114) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 83 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरा83 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ६२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २४ महिला व ३८ पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील 32 जण मुर्तिजापूर येथील, बेलुरा ता. पातुर येथील सात जण, पालसो बधे येथील चार  जण, चिखली ता मुर्तिजापूर, लहान उमरी येथील तीन जण, अकोट, आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जैन मंदिर, गणेश नगर,महसूल कॉलनी तांडी, मलकापूर, खदान, खेतान नगर, बेलखेड ता. मुर्तिजापूर व कंचनपुरा पुरद  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व १४ पुरुष आहेत. त्यात कानडी ता. मुर्तिजापूर  येथील चार जण, खेडकर नगर व निंबा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन जण, हातगाव ता. मुर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित शास्त्री नगर, शिरसो ता. मुर्तिजापूर, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, मलकापूर, इंदिरा कॉलनी, गीता नगर व भारती प्लॉट  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज  चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कृपया नोंद घ्यावी.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मोठी उमरी, विठ्ठल नगर, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष असून तो दि. २ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

53 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३२ जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११ जण, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण तर कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून पाच जणांना असे एकूण ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

976 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4700 (3793+793+114) आहे. त्यातील 166 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3558 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 976 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ