315 अहवाल प्राप्त; 68 पॉझिटीव्ह, 65 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.28(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  315 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 247 अहवाल निगेटीव्ह तर 68 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7297(5989+1153+155) झाली आहे. आज दिवसभरात 65 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 38483 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  37520, फेरतपासणीचे 207 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 756 नमुने होते. आजपर्यंत एकूण 37647 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 31658 तर पॉझिटीव्ह अहवाल  7297(5989+1153+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 68 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 68 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 24 महिला व 35 पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 10 जण, सिंधखेड, गौरक्षण रोड, विठ्ठल नगर व जीएमसी येथील प्रत्येकी तीन जण, सिंधी कॅम्प, सिव्हील लाईन, वडाळी देशमुख, अकोट, तेल्हारा, शास्त्री नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित टि फॅक्टरी, पोळा चौक, बोरगाव मंजू, बाळापूर, लहान उमरी, अकोली जहागीर, गोडबोले प्लॉट, गोकूल कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, जोगळेकर प्लॉट, मलकापूर, डाबकी रोड, जठारपेठ, शिवाजी नगर, कपिला नगर, व्यकेटेश नगर, शास्त्री नगर, पिंपरी, धामोरी, भगोरा, सिरसो, निर्सग अर्पाटमेन्ट व गुडधी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व आठ पुरुष  आहे. त्यातील कौलखेड येथील तीन जण तर उर्वरित बस स्टँड मागे, महसूल कॉलनी, दुर्गा चौक, शिवाजी नगर, गोरेगाव, कोठारी वाटीका  येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जीएमसी, अकोला येथील 72 वर्षीय पुरुष असून तो 19 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

65 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 29 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 21 जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून तीन जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून 10 जणांना, अशा एकूण 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1574 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या  7297(5989+1153+155) आहे. त्यातील 226 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  5497 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1574 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ