मास्क न वापरणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्यासाठी अधिकारी नियुक्त


अकोला,दि. 29 (जिमाका)- कोविड-19 च्या उद्रेक कालावधीमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल किवा इतर तत्सम साधनाचा वापर न करण्याऱ्या विरुध्द जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे पुढील अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यासाठी प्राधिकृत केले आहे.

नो मास्क, नो सवारीअंतर्गंत एसटी व खाजगी बसने प्रवास  करणारे, प्रवासी व माल वाहतूक करणारे यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस निरिक्षक शहर वाहतूक, विभाग नियंत्रण राज्य परिवहन यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तसेच नो मास्क, नो पेट्रोलसप्लाय अंतर्गंत वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक व वाहने यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ‘नो मास्क, नो सर्व्हीसेसअंतर्गंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोस्ट ऑफीस, एलआयसी ऑफीस, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी व खाजगी बँक व इतर शासकीय कार्यालय येथे येणाऱ्यावर संबंधित विभागाचे प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेचनो मास्क, नो सर्व्हीसअंतर्गंत हॉटेल व स्विटमार्टवर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिका यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ‘नो मास्क, नो सर्टिफिकेटअंतर्गंत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांच्या कार्यालयाकडे येणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित विभाग व कार्यालय प्रमुखाना देण्यात आले आहे.

 ‘नो मास्क, नो एँट्रीअंतर्गंत दुकानदार व कापड विक्रेते यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका व नगरपरिषद तसेच नो मास्क, नो बाईकअंतर्गंत रस्त्यावर वाहन चालविण्यावर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिका यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ‘नो मास्क, नो सेलया अंतर्गंत भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, दुग्धविक्रेते व मद्यविक्रेते यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका व राज्य उत्पादन शुल्क यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ‘नो मास्क, नो मेडीसीनया अंतर्गत औषधीचे दुकानावर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. ‘नो मास्क, नो धान्यअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

संबंधित विभागाने मार्गदर्शक सूचनेनुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरीता आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे पथके तयार करावे. तसेच दुकानदार, प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्याकडून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यास नियमानुसार गुन्हे दाखल व दंड वसूली करण्यात यावी. चेहऱ्यावर मास्क न लावलेल्या विरुध्द प्रत्येकी दोनशे रुपये दंड तसेच दुकानदार, प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्याविरुध्द दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ