कपाशीवरील तुडतुडे व फुलकिड्यांचे व्यवस्थापनासाठी उपाययोजना
अकोला,दि.2 (जिमाका)-
जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवासांपासून पडत असलेला रिमझिम पाऊस, अधूनमधून
तापणारे उन आणि ढगाळ वातावरण तुडतुडयांच्या प्रादुर्भावास पोषक असून कपाशी पिकावर
तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे, फिक्कट
हिरव्या रंगाचे असून तिरकस चालतात. प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानाच्या खालच्या
बाजूस राहुन रस शोषतात त्यामुळे सुरुवातीस पानांच्या कडा पिवळसर पडतात. पाने
आतल्या बाजूने वळतात. काही दिवसांनी पानांच्या कडा लालसर होतात. जास्त प्रादुर्भाव
असल्यास झाडाची पूर्ण पाने लाल होतात. आणि जळल्यासारखी दिसतात. यालाच
हॉपर बर्न असेही म्हणतात.
काही ठिकाणी
कपाशीवर फुलकिड्याच्या देखील प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. फुलकिड्यांचे
प्रौढ आणि पिल्ले पानांच्या मागील बाजूस शिरेजवळ राहुन पान खरवडून त्यातून निघणारा
रस शोषण करतात. फुलकिड्यांनी खरवडलेल्या
भागावर पांढुरके चट्टे पडतात. उन्हात तो भाग चमकतो. प्रादुर्भाव असल्यास पाने कडक होतात आणि
फाटतात. पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येतो. झाड निस्तेज दिसते आणि वाढ
मंदावते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा