औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) प्रवेशसत्रासाठी नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज

 अकोला,दि. 21(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला मनकर्णा प्लॉट, अकोट स्टँड, शिवाजी कॉलेज रोड जि. अकोला या संस्थेमध्ये ऑगस्ट 2020 या सत्राकरीता केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीमध्ये प्रवेश अर्ज सादर न करु शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरी मध्ये संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अर्ज स्विकृती 05.10.2020 सायंकाळी 5.00 वाजेपर्यत आहे. प्रवेश इच्छुकांनी www.admision.dvet.gov.in वर जाऊन अर्ज ऑनलाईन नोंदणी करावा.

        या संस्थेमंध्ये खालील व्यवसायाकरीता प्रवेश उपलब्ध आहेत. इंजिनियरींग ट्रेड मध्ये इंन्टेरीअर डिझाईन ॲन्ड डेकोरेशन, इलेक्टॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉरमेशन ॲन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेन्टनन्स, तसेच नॉन इंजिनिअरींग ट्रेड मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, सेक्रेटीयल प्रॅक्टीस (इंग्रजी) फ्रुटस् ॲन्ड व्हिजीटेबल प्रोसेसिंग, बेकर ॲन्ड कन्फेक्शनर, ड्रेस मेकींग, बेसिक कॉस्मेटोलॉजी व फॅशन डिझाईन ॲन्ड टेक्नालॉजी हे ट्रेड उपलब्ध आहेत.

        सदर संस्था अकोला जिल्हयामध्ये महिला व मुलींकरीता राखीव असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा. महिला मुलीन करीता वयाची अट नाही व महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्हा किंवा तालुक्यातील मुली किंवा महिला अर्ज करु शकतात.तसेच रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध आहेत. अधिक माहिती करीता www.admision.dvet.gov.in या संकेत स्थ्ळावर माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. प्रवेशा बाबत काही अडचण असल्यास संस्थेमंध्ये मार्गदर्शन सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ